झीरो ऑइल ब्रोकोली आणि झुकीनी चिकनरेसिपीचे नांव कदाचित मोठे वाटत असले, ही डिश वाटते तितकीच स्वस्थ आहे. झीरो ब्रोकोली आणि झुकीनी चिकनमध्ये कमी चरबी, कमी कार्ब्स असतात आणि त्याची एक आश्चर्यकारक चव असते जी आपल्या जिभेस मंत्रमुग्ध करेन.
रेसिपीचे नांव कदाचित मोठे वाटत असले, ही डिश वाटते तितकीच स्वस्थ आहे. झीरो ब्रोकोली आणि झुकीनी चिकनमध्ये कमी चरबी, कमी कार्ब्स असतात आणि त्याची एक आश्चर्यकारक चव असते जी आपल्या जिभेस मंत्रमुग्ध करेन.
Ingredients
- १ किलो बोन असलेले चिकन, तुकडे केलेले
- ½ कप ब्रोकोली, मोठ्या तुकड्यांमध्ये कापलेली
- ½ कप झुकीनी, मोठ्या तुकड्यांमध्ये कापलेले
- १ मोठा कांदा, चार भागांत कापलेला
मॅरीनेडसाठी
- १ टेबलस्पून लसूण पेस्ट
- २ टीस्पून टोमॅटो पेस्ट
- २ तेजपाने
- ६ ते ८ कुटलेली काळी मिरी
- ¼ टीस्पून जायफळ पावडर
- ¼ कप ताजा अजमोदा (ओवा), चिरलेला
- ५-६ टेबलस्पून बीबीक्यू सॉस
- १टेबलस्पून लिंबाचा रस
- ½ कप पाण्यामध्ये भिजवलेला १ टेबलस्पून ऑल-पर्जन पीठ (मैदा)
- चिरलेली ताजी अजमोदा (ओवा) पाने
- चवीनुसार मीठ
Preparations

- चिरलेली ताजी अजमोदा (ओवा) पाने (गार्निशसाठी) वगळता, सर्व मॅरीनेड सामग्रीसह चिकनला मॅरीनेट करावे. त्यास ३० मिनिटे तसेच राहू द्यावे.
- कुकरला राइस सेटिंगवर सेट करावे.
- मॅरीनेट केलेले चिकन आणि भाज्या घालाव्यात आणि प्रेशर कुक करावे.
- एकदा नॉब कीप वार्म स्थितीमध्ये पोहोचल्यानंतर आणि चिकन शिजळ्यानंतर, लिड उघडे ठेवून आणि अधूनमधून हलवून (आवश्यक असल्यास) अतिरिक्त पाणी काढून टाकावे.
- सॉसचा चिकन आणि भाज्यांवर चांगला लेप चढू द्यावा.
- ताज्या अजमोदा (ओवा) सह गार्निश करावे.
- गार्लिक ब्रेडसह सर्व्ह करावे.
Cooking tip
सॉसचा चिकन आणि भाज्यांवर चांगला लेप चढला आहे याची खात्री करावी.
