स्टफ्ड बेक केलेली झुकीनी
Ingredients
- हेल्दी मील २०० ग्रॅम पनीर
- २ टेबलस्पून पिवळी बेल मिरी
- २ टेबलस्पून लाल बेल मिरी
- २ टेबलस्पून हिरव्या मिरच्या
- १ टेबलस्पून लसूण
- चवीनुसार काळी मिरी
- ३-४ उन्हात वळविलेले टोमॅटो
- चवीनुसार मीठ
- २ झुकीनी
- स्प्रे करण्यासाठी ऑलिव्ह तेल
- गार्निश
- टोमॅटो चटणी
- मिरची तेल
- कोथिंबीरची पाने
Preparations

- एका मिक्सिंग बाउलमध्ये पनीर, पिवळी लाल मिरी, हिरव्या मिरच्या, लसूण, काळी मिरी, उन्हात वळविलेले टोमॅटो, मीठ घालावे आणि त्यांना एकत्र मिक्स करावे.
- एका पिवळ्या आणि हिरव्या झुकीनीची सालटे काढावीत आणि आतील गर काढून घ्यावा. त्यात मिश्रण भरावे. उषा ३६०आर हॅलोजन ओव्हनच्या बेकिंग ट्रेवर स्टफ केलेली झुकीनी ठेवावी. ट्रे ओव्हन मध्ये ठेवावा आणि थोडे ऑलिव्ह तेल स्प्रे करावे. १० मिनिटे १६० डिग्री सेल्सिअसवर बेक करावे.
- टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व्ह करावे आणि मिरचीचे तेल आणि कोथिंबीरच्या पानांसह गार्निश करावे.
Cooking tip
भाज्यांनी भरलेले आणि मिरचीचे तेल आणि ताज्या कोथिंबीरसह टॉप केलेली बेक्ड झुकीनी एक स्वादिष्ट एपेटाइजर किंवा एक साइड आहे.